मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिल्या होत्या सूचना : शिवभक्तांकडून सुरू होता पाठपुरावा
प्रतिनिधी / सातारा
येथील किल्ले अजिंक्यतायाच्या मुख्य प्रवेशद्वारा लगत एक कचराकुंडी ओव्हरफ्लो झाली होती.याबाबत शिवभक्तांकडून मागणी होताच व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सूचना देताच आज पालिकेच्या कर्मचायांनी ती कचराकुंडी स्वच्छ केली. विशेष म्हणजे गोडोलीचे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनीही पाठपुरावा केला होता. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तर सक्त सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत.त्यामुळे आता किल्ले अजिंक्यतारा येथील मुख्य दरवाजा लगत असलेली कचरा कुंडी नियमित स्वच्छ होणार आहे.