सातारा प्रतिनिधी
24 तास लोकांसाठी राबणारे पोलीस जवान यांची काळजी घेणे महत्वाचे आहे.बाहेर अनेक जण पाच फुटाच्या अंतराचा सोशल डिस्टन्सचा नियम मोडून पोलीस जवानाशी वाद घालत असतात.समोरचा कसा व्यक्ती असेल हे सांगता येत नाही किती काळजी घ्यावी तेवढी कमीच आहे. पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून शाहूपुरी या पोलीस ठाण्यात सॅनिटायझर शॉवर बसवले असून सातारा शहर, सातारा तालुका, बोरगाव पोलीस ठाण्यात बसवण्यात येणार असल्याचे समजते.पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या सॅनिटायझर शॉवरचे प्रात्यक्षिक पाहिले.यामुळे शाहूपुरी पोलिसांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक सुरक्षितता मिळत आहे.