वाई / सातारा
वाई शहरातील व्यापारी व भाजी विक्री करणायांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वाब तपासणी करण्यात यावी अशी नोटीस वाई पालिकेच्यावतीने देण्यात आली होती.मुख्याधिकारी विध्या पोळ यांच्यासोबत बैठक पार पडली होती.त्यानुसार वाई तील 106 भाजी विक्री करणाया विक्रेत्यांनी आज अँटीजेन टेस्ट केली.सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली. संघटनेचे मार्गदर्शक साचिन फरांदे, हेमंत येवले, अजित वनारसे, उमेश शहा, अशोक लोखंडे, संतोंष् जमदाडे, युसूफ बागवान, ऋषिकेश नेवशे, रफिक शेख या सर्वानी पारिश्रम घेतले.या टेस्ट शिवसेना भवनात घेण्यात आल्याने वाई शिवसेना शहरप्रमुख किरण खामकर यांचे आभार मानण्यात आले.