प्रतिनिधी/ सातारा
सहकार व पणन मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तत्परतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन आज पहायला मिळाले.
मार्डी (ता. माण) गावाकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना वडी-त्रिमली गावाजवळ नवीन काम झालेल्या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले. एका लहान मुलासह दाम्पत्य खाली पडलेले पाहून त्यांनी वाहनांचा ताफा थांबवला. गाडीतून प्रथम खाली उतरून त्यांनी त्या लहान मुलासह दाम्पत्याची चौकशी केली. कोणाला काही दुखापत झाली आहे का, याचीदेखील आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत न झाल्याची खात्री पटल्यानंतर नामदार पाटील हे पुढच्या प्रवासकडे मार्गस्थ झाले.