प्रतिनिधी / सातारा :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खेड पिरवाडी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली होती. या प्रकरणी बस चालक संदीप मारुती घाटगे (वय 39, रा. मडिलगे, ता. आजरा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ज्योती बाळासाहेब घोरपडे (वय 33, रा. पोगरवाडी) या त्यांच्याकडील दुचाकी सर्व्हिसिंग करण्यासाठी घेवून निघाल्या होत्या. खेड पिरवाडी येथे दि. 2 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी क्रमांक एमएच 13 सीयु 6878 ने त्यांना धडक दिली. या धडकेत ज्योती यांच्या हाता-पायाला दुखापत झाली तसेच गाडीचे नुकसान झाले असून, या प्रकरणी एसटी चालक संदीप घाटगे पोलीस हवालदार कारळे हे तपास करत आहेत.