श्रीराम सेना-हिंदू राष्ट्रसेना कार्यकर्त्यांकडून उपचार
वार्ताहर / हिंडलगा
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गायीला श्रीराम सेना व हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी वेळीच उपचार करून जीवदान दिले. हिंडलगा येथील बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहासमोर हा अपघात झाला होता. त्यामध्ये गायीला गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत गाय रस्त्याकडेला पडली होती. याबाबत माहिती मिळताच हिंदू राष्ट्रसेना व श्रीराम सेनेचे बेळगाव प्रमुख रविकुमार कोकितकर यांनी त्वरित धाव घेत पशुवैद्याधिकारी डॉ. जाधव यांना पाचारण करून गायीवर उपचार केले. त्यानंतर गायीला मालकाकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी रविकुमार कोकितकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते नागेश सरप, सचिन बुद्धण्णावर, सचिन तुप्पट, दौलत देवगेकर, राहुल काकतकर, विनायक हंगिरगेकर आदींनी परिश्रम घेतले.