सुतगट्टीजवळ ट्रकची बसला धडक
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टीजवळ भरधाव ट्रकने आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) च्या जवानांना घेऊन जाणाऱया बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले.
शुक्रवारी रात्री हा अपघात घडला असून शनिवारी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजेश गुप्ता (वय 28), सकना रोहित (वय 29), गोपाल सुमन (वय 28), दाबी दिनेश (वय 53), रशपाल सिंग (वय 50), ई. शिवकुमार (वय 43) अशी जखमींची नावे आहेत.
जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर ट्रक जागेवर सोडून चालकाने पलायन केले आहे. काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक आर. टी. लक्कनगौडर आदी अधिकारी पुढील तपास करीत आहेत.