पेडणे / प्रतिनिधी
शिवोली येथे अपघातात गंभिररित्या जखमी झालेल्या देवसु कोरगाव येथील नरेंद्र उर्फ नारायण वसंत तळवणेकर (वय 29) या युवकाला काल ( 24 रोजी ) रात्री उपचार सुरु असताना मृत्यू आला.ता.20 डिसेंबर रोजी रात्री शिवोली येथे त्याच्या मोटारसायकलला अपघात होवुन नरेंद्र गंभीररीत्या जखमी झाला होता. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरु होते.आज सकाळी वाडय़ावर
त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच शोककळा पसरली . दुपारी त्याचा शव घरी आणल्यावर अंत्य दर्शनासाठी गर्दी उसळली. विरंगोळी देवसू येथील स्मशानभूमीत त्याचावर अंत्यसंस्कार झाले. सहा महिन्यापुर्वीच त्याचा विवाह झाला होता.त्याच्या पत्त्शात पत्नी ,आई वडील व एक बहीण असा परिवार आहे.