वार्ताहर/ रामदुर्ग
अपघातामध्ये मरण पावलेल्याच्या कुटुंबीयास कामगार खात्याकडून मंजूर झालेला 5 लाख रुपयांचा परिहार निधीचा धनादेश भारतीय मजदूर संघाद्वारे मृत कुटुंबीयांच्या सदस्यांना देण्यात आला
कर्नाटक राज्य बांधकाम कामगार मजदूर संघाचे अध्यक्ष प्रशांत कलादगी यावेळी बोलताना म्हणाले, की तालुक्मयातील होसकोटी येथील कामगार चिदानंद महादेवप्पा बडीगेर हा काम संपवून मोटारसायकलवरून घरी येत असताना अपघात होऊन त्यात ते मरण पावले होते. त्यांच्या कुटुंबीयांना कामगार खात्याकडून मंजूर झालेले 5 लाख रुपये परिहार निधीमधून 2.5 लाख रुपये नगद व 2.5 लाख रुपये बचत खात्यात ठेवण्यात आले आहेत. तसेच संघाकडून अनेक सवलती असून कामगारांनी नोंदणी करीत संघाचे सदस्य होण्याचे आवाहन त्यांनी केले.
संघाचे प्रमुख अर्जुन जाधव, कांतेश रायबाग, शेखप्पा बडीगेर, मुतप्पा हडपद, हणमंत मादर, बसप्पा माळशेट्टी, हेमा हंचनाळ, अक्कमा मळली, प्रेमा आलगुंडी, हुसेनबी मुल्ला, गीता शिरूर आदी उपस्थित होते.