खानापूर/ वार्ताहर
खानापूर पारिस्वाड रोडवर गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास अपघाती मृत्यू झालेल्या त्या मनोरुग्ण महिलेवर खानापुरातील कदंबा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आला याकामी कदंबा फाऊंडेशनचे जॉर्डन गोन्साल्विस पिंटू साळुंखे मंजू नाईक मायकल आंध्रादे व इतर कार्यकर्ते उपस्थित होतेखानापूर शहर परिसरात सदर मनोरुग्ण महिला गेल्या महिन्याभरापासून वावरत होती पारीस्वाड क्रॉस परिसरात अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एक मनोरुग्ण महिला धुडगूस घालताना दिसत होती सदर मनोरुग्ण महिलेला दोन–तीन बेळगावला सोडण्यात आले होते परंतु पुन्हा पुन्हा सदर महिला खानापूर परिसरात येऊन वावरत होती या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांना दररोज त्रास देणे ,पैशाची मागणी करणे, हॉटेलात खाणेपिणे करणे न दिल्यास दगड फेक करणे असे प्रकार करत होती,
गुरुवारी दिवसभर तर जांबोटी सर्कल मधील बसवेश्वर पुतळा परिसरात दगडफेक करून ओरडत असताना दिसत होती, रात्री आठच्या सुमारास सदर मनोरुग्ण महिला पारिस्वाड क्रॉस परिसरातून नाल्याकडे जात असताना नाल्या नजीक अज्ञात वाहनाच्या ठो करीत तिचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर वृत्त मनोरुग्ण महिलेचा मृतदेह खानापूर शासकीय रुग्णालयात तील सभाग्रहात ठेवण्यात आला परंतु सदर महिलेचे कोणीही नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी अथवा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाहीत त्यामुळे खानापुरातील कदंबा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने मलाप्रभा नदी घाटावरील स्मशानात स्वखर्चाने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला गेल्या महिनाभरापासून अनेक व्यवसायिक व नागरिकांच्या नजरेत एक मनोरुग्ण महिला म्हणून ती ती बसली होती तिचा अपघाती मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केला व तिच्या अंत्यसंस्काराला नदी घाटावर उपस्थिती दर्शविली होती कदंबा फाउंडेशनच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे