ऑनलाईन टीम
दाते पंचांगाच्या मराठी आवृत्ती मध्ये 6 जून रोजीच अपरा एकादशी दिलेली आहे. मात्र कन्नड आवृत्त्तीमध्ये नजर चुकीने 5 जून रोजी छापली गेली आहे. हा मुद्रण दोष असून सर्वांनी 6 जून रोजीच एकादशी साजरी करावी, अशी विनंती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे निवेदन केले आहे. सध्या त्यांचे हे निवेदन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या निवेदनात मोहन दाते यांनी म्हटले आहे की, दिनांक 5 रोजी शनिवारी वैशाख कृष्ण एकादशी अहोरात्र असून दिनांक 6 रोजी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी एकादशी समाप्ती होत आहे. स्मार्त भागवत दोन्ही संप्रदायांच्या नियमानुसार दिनांक 6 रोजी अपरा एकादशी करणे शास्त्र संमत असून दाते पंचांगाच्या मराठी आवृत्ती मध्ये 6 रोजीच एकादशी दिलेली आहे मात्र कन्नड आवृत्त्ती मध्ये नजर चुकीने 5 रोजी छापली गेली आहे. हा मुद्रण दोष असून सर्वांनी 6 रोजीच एकादशी साजरी करावी, अशी विनंती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केली आहे.