सदलगा पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचे लैंगिक छळ करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अपहरणाची ही घटना घडली होती. दोन महिन्यांनंतर त्या अल्पवयीन मुलगी पोलिसांना सापडली आहे.
या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भोज येथे ही घटना घडली असून 13 मे रोजी अपहृत अल्पवयीन मुलगी पोलिसांना सापडली आहे. तिला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यासंबंधी रायबाग येथील प्रवीण कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदलगा पोलीस पुढील तपास करीत आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार आहे.