मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती तालुक्मयातील मुगळीहाळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
त्या 16वषीय अल्पवयीन मुलीला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोपाल वर्गणावर (रा. हडगीनाळ) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन त्याने तिच्याशी लग्नही केल्याचे समजते. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.