नवी दिल्ली
टीव्हीएस या दुचाकी क्षेत्रातील कंपनीने आपली नवी अपाचे आरटीआर 160 4 व्ही 2021 मोटारसायकल नुकतीच लाँच केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 1.07 लाख रुपये इतकी असणार आहे. डिस्क ब्रेक व्हर्जन व ड्रमबेक व्हर्जन अशा दोन प्रकारात मोटारसायकल लाँच करण्यात आली आहे. दोन्ही गाडेची (दिल्ली एक्सशोरुम) किंमत अनुक्रमे 1 लाख 10 लाख 320 रु. व 1 लाख 7 हजार 270 रुपये इतकी असणार आहे. आधीच्या तुलनेत या मोटारसायकलचे वजन 2 किलोग्रॅम कमी आहे. टाकीची इंधन क्षमता 12 लिटरची आहे. नव्या गाडीत डय़ुअल स्टोन सीट, एलईडी हेडलॅम्पची सोय आहे.