मुंबई : खासगी गुंतवणूक फर्म अपॅक्सने आयटी सेवेतील कार्यरत फर्म 3 आय इन्फोटेकची खरेदी केली असल्याचे समजते. ही खरेदी 1 हजार कोटींना झाल्याचे सांगण्यात येते. 3 आय इन्फोटेकने आपला सॉफ्टवेअर उत्पादनाचा व्यवसाय अपॅक्सला विक्री करण्याचे निश्चित केले आहे. सदरच्या व्यवहाराचा प्रस्ताव समभागधारकांपुढे मांडण्यात आला आहे. यांच्या मंजुरीसह नियामकचीही मंजुरी 2021 मध्ये सुरूवातीच्या काही महिन्यात मिळाली की व्यवहार अंतिम केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. 3 आय इन्फोटेकचा व्यवसायातील वार्षिक महसूल 60 दशलक्ष डॉलर्सचा आहे.
Previous Articleभारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून
Next Article पोलादाच्या किमतीत वाढ सुरूच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.