स्थायीत मगदूम यांची मागणी आयुक्तांनी सही केलीच कशी? ; प्रशासनाचा कारभार संशयास्पद
प्रतिनिधी / सांगली
अपेक्स प्रकरणात महापालिकेची बदनामी सुरू आहे. आयुक्त मात्र याबाबबत काहीही बोलायला तयार नाहीत. या पाठीमागे काय गौडबंगाल आहे याचा खुलासा आयुक्त नितीन कापडणीस यांनी करावा, अशी मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्थायी समिती मध्ये बोलताना केली. एका दिवसात या हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे, एवढी घाई कशासाठी केली असा सवालही मगदूम यांनी उपस्थित केला.
सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा ऑनलाईन अॅपद्वारे पार पडली.
सभेत अपेक्स हॉस्पिटल प्रकरणावरून होत असलेल्या चर्चेचा मुद्दा सदस्य मगदूम यांनी उपस्थित केला. मगदूम म्हणाले, अपेक्स हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र डॉ. जाधव याला कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी एका दिवसात,तीही केवळ एका साद्या अर्जावर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.