येणाऱया तिमाहीत दर वाढविणार – 3 ते 5 टक्के वाढ शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टायरच्या क्षेत्रातील प्रमुख टायर निर्मिती कंपनी म्हणून ओळख असणारी अपोलो टायर्स आपल्या टायर्सच्या किमती वाढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षातील तिसऱया तिमाहीत देशातील बाजारात आपल्या टायर्सचे भाव हे साधारणपणे तीन ते पाच टक्क्यांनी वाढविणार असल्याची माहिती आहे.
या संदर्भात माहिती देताना अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवरने यांनी म्हटले आहे, की सप्टेंबरपर्यंत कंपनीने टायर्सच्या किमती 9 टक्क्यांनी वाढविल्या आहेत. येणाऱया काळातही वफंनीला टायर्सच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत.
येत्या काळात चालू तिमाहीत (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) या कालावधीत आम्ही तीन ते पाच टक्के किमती वाढविणार असल्याची माहिती कंवर यांनी दिली आहे.
नफ्यात झाली घट
चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबरमध्ये समाप्त झालेल्या दुसऱया तिमाहीत अपोलो टायर्सचा निव्वळ नफा 59 टक्क्यांनी घटून 89.65 कोटी रुपयावर राहिला आहे. मागील आर्थिक वर्षातील समान तिमाहीत 216.24 कोटी रुपये नफा राहिला होता. उत्पन्न वाढून 3,649.71 कोटी रुपयावर पोहोचले आहे.