वृत्तसंस्था/ काबुल
अफगाण क्रिकेट संघातील आघाडीफळी खेळणारा फलंदाज 29 वर्षीय नजिब ताराकाई याचा कार दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती अफगाण क्रिकेट मंडळाने दिली आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या वाहन अपघातात ताराकाईला गंभीर दुखापत झाली होती.
2 ऑक्टोबर रोजी नजिब ताराकाईच्या मोटारीला अपघात झाला होता. या अपघातात ताराकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला काबुलमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय इलाज चालू असताना त्याचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरानी दिली. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अफगाण क्रिकेट मंडळातर्फे ताराकाईला श्रद्धांजली वाहण्यात आली. ताराकाईने एकमेव वनडे आणि 12 टी-20 सामन्यात अफगाण संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2014 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि 2019 च्या सप्टेंबर महिन्यात आपला शेवटचा सामना बांगलादेश विरूद्ध खेळला होता.