वृत्त संस्था/अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नामिबिया संघाविरूद्ध लढतीनंतर अफगाण संघातील फलंदाज असगर अफगाणने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.
33 वर्षीय असगर अफगाणकडे यापूर्वी अफगाण संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. टी-20 प्रकारात कर्णधार या नात्याने अफगाण संघाला सर्वाधिक सामने जिंकून देण्याचा विक्रम असगरने नोंदविला असून त्याने धोनीचा विक्रम मागे टाकला आहे.
अफगाण संघातील असगर हा अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातो. 2009 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 6 कसोटी, 114 वनडे आणि 74 टी-20 सामन्यात अफगाणचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 44 च्या सरासरीने 440 धावा, वनडे क्रिकेटमध्ये 24.73 सरासरीने 2424 धावा आणि टी-20 प्रकारात 21.79 सरासरीने 1351 धावा जमविल्या आहेत.