अबुधाबीतील पहिली कसोटी
दुबई / वृत्तसंस्था
कर्णधार सीन विल्यम्सचे (105) दमदार शतक व गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा पहिल्या कसोटीत 10 गडी राखून फडशा पाडला आणि 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अबुधाबीतील या लढतीत अफगाणचा पहिला डाव 131 धावात आटोपल्यानंतर झिम्बाब्वेने सर्वबाद 250 धावांची मजल गाठत उत्तम आघाडी मिळवली. त्यानंतर अफगाणचा दुसरा डाव 135 धावांवर आटोपल्यानंतर झिम्बाब्वेला दुसऱया डावात विजयासाठी 17 धावांची गरज होती. ती त्यांच्या सलामीवीरांनी सहज पार केली. उभय संघातील दुसरा व शेवटचा कसोटी सामना याच ठिकाणी दि. 10 मार्चपासून खेळवला जाणार आहे. सीन विल्यम्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान पहिला डाव- सर्वबाद 131 (अफसर झॅझई 37, मुझरबानी 4-48, व्हिक्टर न्ययूची 3-34), झिम्बाब्वे पहिला डाव ः सर्वबाद 250 (सीन विल्यम्स 174 चेंडूत 10 चौकारांसह 105, अमिर हमझा 6-75), अफगाण दुसरा डाव ः सर्वबाद 135 (झद्रन 10 चौकारांसह 76, व्हिक्टर, डोनाल्ड ट्रिपॅनो प्रत्येकी 3 बळी), झिम्बाब्वे दुसरा डाव बिनबाद 17 (प्रिन्स नाबाद 5, केव्हिन कसुझा नाबाद 11).