ऑनलाईन टीम / दिल्ली
तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी देशातील एकेकाळच्या प्रमुख महिला नेत्या फौझिया कूफी (Foujia Khufi) प्रथमच संयुक्त राष्ट्राला (UN) भेट देणार आहेत. अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य असलेल्या,तसेच एकेकाळच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित असलेल्या महिला नेत्या फौझिया कूफी एक निर्वासित महिला म्हणून संयुक्त राष्ट्रातील उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
एका मुलाखतीत फौझिया कूफी यांनी जगभरातील देशांनी अफगाणिस्तानला (Afganistan) मानवतावादी दृष्टीकोनातुन मदत करावी असे आवाहन केले आहे.आणि या मदतीच्या वितरणात महिलांचा जास्तीतजास्त सहभाग करावा तसेच महिलांच्या अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानबाहेरील मोफत आणि सुरक्षित प्रवासासाठी संयुक्त राष्ट्राने उपाययोजना करावी असे सुचवले.
अफगाणिस्तानमधील समावेशकता आणि समान हक्कांबाबत सदस्य राष्ट्रांनी तडजोड करू नये असे आवाहन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राला भेट देणाऱ्या अफगाण महिलांच्या शिष्टमंडळाच्या सहभागी असणाऱ्या कुफी म्हणतात की अफगाणिस्तानला होणाऱ्या मदतीचे राजकारण कोणीही करू नये,मदतीच्या प्रत्येक टप्प्यात महिलांचा सहभाग वाढवुन त्याचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.स्त्रिया केवळ प्राप्तकर्त्या नसल्या पाहिजेत तर त्यांचा सहभाग वाढवला पाहीजे.
फौजिया कूफी ऑगस्टमध्ये काबूलमधून पळून आल्या होत्या. तेव्हापासून त्या युरोपमधील हॉटेलच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. तिने आपल्या देशापासून विभक्त होण्याऱ्या वेदना सांगून स्वतःसाठी आणि तिच्या दोन मुलींसाठी निवास शोधण्यासाठी कसे झगडावे लागत आहे. याचे वर्णन केले.