70 वर्षांची ‘बाज कमांडर’ : तालिबानशी दशकांपर्यंत लढा : रशियाशीही संघर्ष
वृत्तसंस्था/ काबूल
70 वर्षीय अफगाणिस्तानच्या बंडखोर म्होरक्या बीबी आयशा यांनी तालिबानसमोर शस्त्रास्त्रs म्यान केली आहेत. बीबी आयशा बागलान प्रांताच्या नाहरिन जिल्हय़ातील असून अफगाणिस्तान सरकारपासून तालिबानच्या कमांडरांमध्ये त्यांना ‘बाज कमांडर’ या नावाने ओळखले जाते. गरुडाप्रमाणे लक्ष्याला संपवून त्या फरार व्हायच्या. स्वतःला बदलू शकेल किंवा समाजात सुधारणा घडवून आणण्याची पात्रता तालिबानमध्ये नाही. सरकार बिनकामाचे आहे. अफगाणिस्तानातील हे युद्ध शांततेत कधीच परिवर्तित होणार नाही. या प्रश्नाला देवच सोडवू शकतो किंवा सुंदर क्लाशनिकोव्ह रायफल्स, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
तालिबानसोबत तडजोड
माझ्या आईने तालिबानसमोर गुडघे टेकलेले नाहीत तसेच ती तालिबानशी हातमिळवणी देखील करत नाही. ती आजारी असून गुडघेदुखीमुळे तिचे हिंडणेही अशक्य झाले आहे. तालिबान संघटनेशी लढण्याची इच्छा नसल्यानेच तडजोड करण्यात आल्याचे आयशा यांचे पुत्र राज मोहम्मद यांनी म्हटले आहे. बाज कमांडरने अफगाण सरकारला बाजूला सारून तालिबानशी तडजोड केल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
प्रदीर्घ संघर्ष
अफगाणिस्तान सरकारची स्थिती किती नाजूक आहे हे या घटनेतून स्पष्ट होते. बागलान खोऱयात बीबी आयशा यांचे नाव 1979 पासून चर्चेत आले होते. त्यावेळी रशियाच्या कमांडोंनी त्यांच्या क्षेत्राला घेरले होते. आयशा यांनी तेव्हा स्वतःचे सैन्य तयार करत भागाच्या सुरक्षेसाठी रशियन कमांडोंशी लढत त्यांना पराभूत केले होते. 1990 च्या दशकात तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानवर स्वतःचा कब्जा केला होता, तेव्हाही आयशा यांनी स्वतःच्या क्षेत्रात तालिबानला शिरकाव करू दिला नव्हता.
तालिबानची भीती नव्हती
बीबी आयशा तालिबानी राजवटीला कधीच घाबरल्या नाहीत. तालिबानी कमांडरला अटक केली तर त्याची गाढवावरून धिंड काढणार आहे, तालिबान एका महिलेशी लढताना पराभूत झाल्याचे लोक यावर म्हणतील. तर तालिबानने मला पकडल्यास लोक त्यांच्यावर हसणार असल्याचे त्या उपहासात्मक सुरामध्ये म्हणायच्या.