अध्यक्षांपेक्षाही अधिक आहेत फॉलोअर्स
मागील काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानात पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. अलिकडेच अफगाणिस्तानात तीन तरुण महिला पत्रकारांची दिवसाढवळय़ा हत्या करण्यात आली आहे. तरीही काही असे सोशल मीडिया स्टार्स आहेत, जे या देशाच्या धोकादायक वातावरणातही स्वतःची ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरत आहेत.
आयदा समाजमाध्यमांवर दिवसातून अनेकदा पोस्ट्स करते. त्याच्या इन्स्टाग्रामवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांच्याहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती स्वतःच्या फॉलोअर्सच्या स्टाईलशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देते. देशातील अनेक धोकादायक शहरांमध्ये फिरून स्वतःची सेल्फी पोस्ट करते. ती स्वतःची स्टाईल आणि परिधानाद्वारे अफगाणिस्तानी संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी ओळखली जाते.
तुम्ही स्वतःचे जीवन स्वतःच्या मर्जीने जगू शकता हा संदेश लोकांना देण्याचा माझा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानात असताना आमच्या मनात नेहमीच भीती असेत, पण आम्ही निराश-हताश होऊन जगू शकत नाही असे आयदा सांगते.
शादाब अफगाणिस्तानचे एक सकारात्मक चित्र जगासमोर मांडते आहे. अफगाणिस्तानात केवळ 14 टक्के लोक इंटरनेटचा वापर बातम्या आणि माहिती प्राप्त करण्यासाठी करतात. पण अफगाणिस्तानातील तरुणांमध्ये इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत आहे. शादाबसह अनेक तरुण-तरुणी युद्धग्रस्त देशात स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी झटत आहेत.