मंगळूर/प्रतिनिधी
अफगाणिस्तानचा तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर अफगाण सोडून जाण्यासाठी अनेक नागरिक विमानतळावर गर्दी करत असल्याचे चित्र आपण पहिले आहे. दरम्यान, मंगळूर येथील तीन तरुण अफगाणिस्तानात अडकले होते. आता अफगाणिस्तानात अडकलेले ते तिघे मंगळूरला परतले आहेत. डेसमंड डेव्हिड, दिनेश राय आणि डेम्सी मॉन्टेरो अशी मंगळूरला परतलेल्या तिघांची नवे आहेत. ते तिघे जेव्हा मंगरूळमध्ये आले तेव्हा घरच्यांनी आनंद साजरा केला.
“आम्ही नाटो तळावर काम करत असताना, आम्ही अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित होतो. तालिबान्यांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली तरी आम्हाला भारतात परतण्याचा आत्मविश्वास होता, ”नाटो तळामध्ये एका खाजगी फर्मसाठी काम करणाऱ्या डेसमंड डेव्हिड डिसूझा यांनी मंगळूर येथे आल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
“मी २०११ पासून अफगाणिस्तानमध्ये काम करत आहे. बाहेरची परिस्थिती चिंताजनक होती. आम्हाला तळाबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. आम्ही सुट्टीत आमच्या मूळ गावी जातानाच तळावरून बाहेर पडायचो. १७ ऑगस्टला काबूलहून अमेरिकन सैन्याच्या विमानाने आम्हाला कतारला नेले. कतारहून आम्ही २२ ऑगस्टला नवी दिल्लीला पोहोचलो.
करंबर येथील रहिवासी दिनेश राय म्हणाले की, घरी पोहोचल्यानंतर त्यांना आराम वाटतो. राय म्हणाले की, त्यांनी काबूल विमानतळावर अफगाणांना रोखण्यासाठी अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणांनी विमानतळाजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली तेव्हा मी अमेरिकन सैन्याला हवेत गोळीबार करताना पाहिले आहे.