31 ऑगस्टनंतर नागरिकांना बाहेर काढू देणार तालिबान
अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्यमाघारीला आता केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. अफगाणिस्तानातून आता केवळ 300 अमेरिकन नागरिकांना बाहेर काढणे शिल्लक आहे, त्यांना सुरक्षितपणे अमेरिकेत आणले जाणार असल्याचे उद्गार विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काढले आहेत.
तालिबान 31 ऑगस्टनंतरही लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढू देणार आहे. तालिबानने यासंबंधी आश्वासन दिले असून त्याला त्याची पूर्तता करावी लागेल असे विधान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलविन यांनी केले आहे.
अफगाणिस्तानात सैन्य तैनात न करता देखील तेथील दहशतवाद चिरडून टाकण्याची क्षमता अमेरिकेत आहे. अफगाणिस्तानातील 300 जणांनी देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही वेगाने काम करत असून त्यांना विमानतळापर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सलिवन म्हणाले.
तालिबानकडून सुरक्षा
31 ऑगस्टची मुदत संपणार आहे. पण काही अमेरिकन नागरिकांनी अफगाणिस्तानात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांना अफगाणिस्तानात अधिक काळासाठी ठेवले जाणार नाही. सरकारकडे त्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था आहे. त्यांना तालिबानकडून देखील सुरक्षा मिळणार असल्याचे ब्लिंकेन यांनी सांगितले आहे.
सप्टेंबरपासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात राहणार नाही हे निश्चित झाले आहे, पण अमेरिका काबूल विमानतळावर स्फोट घडवून आणणारा दहशतवादी गट आयएसआयएस-के विरोधातील कारवाई सुरूच ठेवणार आहे.