काबूल
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंद करण्यात आली. भूकंपाचा पेंद्रबिंदू फैजाबादपासून 89 किलोमीटर अंतरावर 200 किलोमीटर खोलवर होता. परंतु या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित तसेच आर्थिकहानीची माहिती प्राप्त झालेली नाही. जून महिन्यात अफगाणिस्तानात भूकंपामुळे 1 हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता. तर 1500 हून अधिक जण जखमी झाले होते.
……………………………………………………………………………………………………