ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांकडून बंदुकीचा धाक दाखवून लूट सुरू आहे.
पाकमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाने काबुलमध्ये अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून जिहादच्या नावाखाली त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात आहे. तालिबानने राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्यानंतर काही तासातच या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. तालिबानचा उपनेता असलेला सिराजुद्दीन हक्कानी याचा अफगाण सरकारमध्ये समावेश व्हावा, अशी पाकिस्तानची इच्व्छा आहे.