ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानात वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टर्सनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 15 कमांडोंचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री दक्षिण हेल्मंडच्या नवा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. टोलो न्यूजच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, दक्षिण हेल्मंडच्या नवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत 8 कमांडोंचा जागीच मृत्यू झाला. तर सात कमांडोंचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताबाबत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते ओमर जवाक यांनी नवा जिल्ह्यात झालेल्या अपघाताला दुजोरा दिला आहे, पण त्यांनी त्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.