काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारे तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला. कतारची राजधानी दोहा येथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या युद्धाचा विजेता म्हणून उदयास आला आहे. बरादर अफगाणिस्तानचा पुढील राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा देखील सुरु आहे.अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला आहे.
तालिबानचा गड असलेल्या कंदाहार शहरात कतारहून सी-१७ विमानाने मुल्ला अब्दुल गनी बरदार कडक सुरक्षा व्यवस्थेत दाखल झाला. विमानतळावर तालिबानींनी बरादरचे जोरदार स्वागत केले.
तालिबानी आणि समर्थकांकडून कंदाहारमध्ये मुल्ला बरादरचे जोरदार स्वागत करण्यात आले. कंदाहार शहरात तालिबान संघटनेची सुरुवात करण्यात आली होती. तालिबानचा हा गड असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे बरादरने काबूलऐवजी कंदाहारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.