काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य मायदेशी परतत असतानाच त्या देशात संघर्ष उफाळून आला असून तेथील सरकारच्या सैनिकांनी 23 तालिबानी दहशतवाद्यांना रविवारी कंठस्नान घातले आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये सैन्य आणि तालिबान यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारच्या संघर्षात 3 नागरिकही प्राणास मुकले. रविवारी दुपारी अलीशिंग जिल्हय़ात अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दलांवर तालिबान दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना सैनिकांनी 24 तालिबानी टिपले. या देशाच्या 50 जिल्हय़ांवर सध्या तालिबानचे नियंत्रण असल्याचे सांगण्यात येते. त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न तेथील सरकारी सेना करीत आहे.