ऑनलाईन टीम / काबूल :
अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील याक जिह्यात एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त विमानातून 80 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानानं हवेतच पेट घेतला असून, ज्या ठिकाणी अपघात झाला तो भाग तालिबानच्या नियंत्रणात आहे. स्थानिक अधिकाऱयांच्या मते, एरियाना अफगाण एअरलाइन्सचं बोइंग 737-400 विमान डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झालं आहे. विमान तांत्रिक कारणामुळे क्रॅश झाले आहे. क्रॅश झाल्यावर विमानाने आग पकडली.
दरम्यान, या विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्ससंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.