- तर पॅसिफिकमध्ये त्सुनामीचा इशारा
ऑनलाईन टीम / अफगाणिस्तान :
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंदकुश पर्वतराजीत बसलेला हा भूकंपाचा झटका 4.9 रिश्टर स्केलचा होता. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार रात्री चारच्या सुमारास हिंदकुश पर्वत रांगांच्या भागामध्ये 4.9 रिश्टर स्केलचा हा भूकंप जाणवला.
दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियाजवळच्या पॅसिफिक महासागराच्या परिसराध्ये समुद्राखाली 10 किमी अंतरावर काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला होता . समुद्राखाली झालेला हा भूकंप 7.7 रिश्टर स्केल इतका मोठा असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तिव्रता अधिक असल्याने या देशांमधील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण पॅसिफिकमधील लॉयल्टी बेटांजवळ समुद्राच्या तळाखाली 10 किमी अंतरावर मोठा भूकंप झाला. हा भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता असे अमेरिकन जिओलॉजिकल सर्वे या संस्थेने स्पष्ट केले. या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.