वृत्तसंस्था/ ढाका
तालिबानने अफगाणवर ताबा मिळविल्यानंतर अफगाण क्रिकेट संघाचे बांगलादेशमध्ये मालिका खेळण्यासाठी शनिवारी येथे आगमन झाले. अफगाण आणि बांगलादेश 19 वर्षाखालील संघामध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे.
तालिबानने अफगाणवर आपले वर्चस्व राखल्यानंतर अफगाणचा 19 वर्षाखालील क्रिकेट संघ बांगलदेशमध्ये दाखल झाला आहे. 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान उभय संघात 5 सामन्यांची वनडे मालिका तसेच 4 दिवसांचा एक सामना खेळविला जाणार आहे. अफगाण संघातील पहिल्या पथकातील आठ खेळाडू शनिवारी येथे दाखल झाले. या अफगाण संघातील उर्वरित खेळाडू दोन टप्प्यांमध्ये ढाक्यात दाखल होणार आहेत.