काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातची राजधानी काबूल येथे एका प्रसूतीगृहावर तालिबानी इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक नवजात बालकांसह 15 व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे. हे प्रसूतीगृह प्रसिद्ध दश्त ए बारची या रूग्णालयाचा भाग आहे. सुरक्ष रक्षकांनी वेळीच कार्यवाही केल्याने या हल्ल्यातून 100 हून अधिक महिला व कर्मचाऱयांची सुटका होऊ शकली. दहशतवाद्यांची संख्या पाच ते सहा असावी असा अंदाज आहे. त्यांनी गेल्या सोमवारी दुपारी प्रसूती गृहात घुसून प्रथम दोन बाँबस्फोट केले. तर अंदाधुंद गोळीबार केला. नंतर सुरक्षा सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते पळून गेले अशी माहिती देण्यात आली.