वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका यापूर्वी लंकेतील हंबनटोटा येथे खेळविली जाणार होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे सदर मालिकेच्या ठिकाणात बदल करण्यात आला असून आता ती पाकमध्येच खेळविली जाणार असल्याची माहिती अफगाण क्रिकेट मंडळाचे सीईओ हमीद शिनवारी यांनी दिली आहे.
तालिबानच्या हल्ल्यानंतर अफगाण क्रिकेट संघाच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. हवाई प्रवास करताना अफगाणच्या संघाला लंकेत काही तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याने सदर स्पर्धा पाकमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा नव्याने सुरू झाला असून गेल्या दोन दिवसामध्ये लंकेत 3793 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत.