ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
काही अज्ञात लढाऊ विमाने कराचीजवळ आकाशात घिरट्या घालत असल्याची अफवा मंगळवारी रात्री पाकिस्तानी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची लढाऊ विमाने हवेत झेपावली. मात्र, या अफवेने पाकिस्तानने संपूर्ण कराची शहराची लाईट रात्रभर बंद ठेवली.
कराचीजवळ लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याचा व्हिडीओ कराचीच्या लोकांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओची खातरजमा न करता पाक हवाई दलाची लढाऊ विमानेही लगेच हवेत झेपावली. त्यामुळे पाकिस्तानात घबराटीचे वातावरण पसरले. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण कराची रात्रभर अंधारात ठेवण्यात आली. सोशल मीडियावरील या अफवेने पाकिस्तानची झोप उडवली.
मागील महिनाभरापासून पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. त्यातच पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्तान निवडणूक घेण्याचे ठरवले होते. त्यावरून भारताने पाकिस्तानला हा भाग खाली करण्यास सांगितले होते. कराचीतील काळीबाणी आणि वाढल्या भीतीमुळे अनेकांनी ट्विटरवरुन भारत मागील वर्षीच्या एएएफने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याची पुनरावृत्ती करत असल्याची अफवा पसरवली होती.