हेस्कॉममध्ये 445 जणांची भरती : गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा निवडीत समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉममध्ये ज्युनियर पॉवरमन पदासाठीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. दहावीतील गुणांच्या आधारे निवड करण्यात आली असून सर्वसाधारण वर्गवारीसाठी तब्बल 92.48 टक्के इतके मेरिट लागले आहे. त्यामुळे पॉवरमन पदासाठीही प्रचंड स्पर्धा झाल्याचे दिसून आले.
हेस्कॉममध्ये ज्युनियर पॉवरमनच्या (लाईनमन) 465 जागा भरून घेण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. दहावी परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2019 रोजी तसेच 1 जुलै 2020 रोजी घेण्यात आली होती. या शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची दहावी परीक्षेतील गुणांच्या आधारे कट-ऑफ गुणांसह हंगामी निवड यादी दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली होती. तसेच यादीबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या. सर्व हरकतींचा विचार करून गुरुवारी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. अधिसूचित करण्यात आलेल्या 465 पैकी 445 जागा भरून घेतल्या.
ज्युनियर पॉवरमन पदासाठी उमेदवारांनी मोठय़ा संख्येने अर्ज केले होते. दहावी परीक्षेत तब्बल 96.96 टक्के गुण घेतलेला विद्यार्थीही या पदासाठी निवडला गेला आहे. 95 टक्क्मयांहून अधिक गुण घेतलेले 25 उमेदवार असून निवड झालेल्या 465 उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांनी 92 टक्क्मयांहून अधिक गुण घेतलेले आहेत.
याशिवाय माजी सैनिक (46.72 टक्के), ग्रामीण (93.44 टक्के), कन्नड माध्यम (94.72 टक्के), प्रकल्पग्रस्त (90.56 टक्के) यांचे कट-ऑफ आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 19 जागा होत्या. परंतु, एकाही उमेदवाराची निवड झाली नाही. सर्वात कमी कट-ऑफ एससी माजी सैनिक पदासाठी 36.96 टक्के इतके लागले.
वर्गवारीनिहाय कट-ऑफ
वर्गवारी | टक्केवारी |
जनरल मेरिट | 92.48 |
2S | 90.88 |
2बी | 89.6 |
3S | 87.2 |
3बी | 91.68 |
प्रवर्ग 1 | 91.36 |
एससी | 89.44 |
एसटी | 90.08 |