स्वतःचा विवाह सोहळा लौकिकार्थाने विशेष ठरावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पाश्चिमात्य जगतात वेडिंग गाउनच्या मागील हिस्स्याचे (वेल) विशेष महत्त्व असते. याचमुळे महिला यासंबंधी अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात. अशीच एक महिला आहे मारिया परस्केवा जी सायप्रसमध्ये राहते. विवाहावेळी जगातील सर्वात मोठा वेडिंग व्हेल परिधान करण्याचे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. तिने हे स्वप्न स्वतःच्या विवाहात पूर्णही केले आहे.
मारियाच्या वेडिंग गाउनच्या वेलची लांबी 6,962.6 मीटर होती. म्हणजेच 63 अमेरिकन फुटबॉल मैदानांच्या एकूण लांबीइतका. प्रसिद्ध किलिमंजारो शिखराची उंची 5,895 मीटर आहे.
मारियाने या विक्रमासाठी 7,100 मीटर म्हणजेच 23 हजार 294 फूटांचा रोल खरेदी केला होता, जो 5.9 फूट जाडीचा होता. या कपडय़ाला विवाहाचा पेहराव आणि सर्व मानकांची पूर्तता करणारा वेल तयार करणाऱया दुकानदाराला शोधणे सर्वात अवघड होते. या कामासाठी ग्रीसमधील एक कंपनी तयार झाली आणि तिला काम पूर्ण करण्यास तीन महिने लागले आहेत. याचे मोजमाप करण्यासाठी मारियाच्या घरानजीकच्या एका शाळेच्या मैदानात फैलावण्यात आले होते. या वेडिंग गाउन वेलला खोलण्यासाठी एक विशेष प्रकारच्या साधनाला पिकअप ट्रकच्या मागे जोडण्यात आले होते. कापड हवेत उडू नये म्हणून 30 सदस्यांचे एक पथक पिन लावण्यासाठी नियुक्त होते. वेल पूर्ण पसरविण्यासाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागला आहे.