वृत्तसंस्था/ अबु धाबी
डब्ल्युटीए टूरवरील महिलांच्या येथे सुरू होत असलेल्या खुल्या डब्ल्यूटीए-500 टेनिस स्पर्धेत बेल्जियमची महिला टेनिसपटू एलिस मर्टेन्सने दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
2021 च्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील ही पहिली स्पर्धा आहे. जागतिक महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 20 व्या स्थानावरील मर्टेन्सच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा सामना सुरू होण्यास काही तास बाकी असताना मर्टेन्सने आपण दुखापतीमुळे माघार घेतल्याचे जाहीर केले. स्पर्धा आयोजकांनी आता या स्पर्धेत एकेरीत मर्टेन्सच्या जागी ग्रिकच्या ग्रॅमेटिक ओपोलोयु हिला संधी दिली आहे.