ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
शिवसेनेचे नवनिर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज होते. त्यामुळे खाते मिळण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.
अब्दुल सत्तार सध्या औरंगाबादेतील अतिथी हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर सत्तार यांची मनधरणी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहचले असून दोघांमध्ये बैठक सुरू झाली आहे.
सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे शिवसेनेने मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. सत्तार यांचा राजीनामा हा शिवसेनेला पहिला धक्का मानला जात आहे.