ऑनलाइन टीम / औरंगाबाद :
अब्दुल सत्तार गद्दार आहेत, सत्तार यांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. तसेच सत्तार यांच्यावर कारवाई करा असं ही ते म्हणाले.
खैरे म्हणाले, सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याची कल्पना नाही. महाविकास आघाडी झाल्यानेच अब्दुल सत्तार मंत्री झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी राज्याचा विचार करुनच झाली आहे असं त्यांनी सांगितले.
या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूकीतील अंतर्गत वाद समोर आला आहे.