अनिता हसनंदानीने केले स्पष्ट
अभिनयाच्या क्षेत्राचा निरोप घेणार नसल्याचे अभिनेत्री अनिता हसनंदानीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुलाचे पालनपोषण आणि कुटुंबासाठी अनिता अभिनयाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
जेव्हा मी तयार होईन तेव्हा स्वतःचे काम सुरू करणार आहे. सद्यकाळात माझी प्राथमिकता माझा मुलगा आरव असून त्यावरच लक्ष केंद्रीत करत असल्याचे तिने सांगितले आहे.
मी माझे पहिले पेम अभिनय म्हणजेच ऍक्टिंग सोडणार असल्याचे वृत्त सर्वत्र दिसून येत आहे. अशाप्रकारचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. सध्या माझे पूर्ण लक्ष आरववर केंद्रीत असल्याचे मी म्हटले होते. आरव माझी प्राथमिकता असल्याचे ती म्हणाली. अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी या दांपत्याला फेब्रुवारी महिन्यात पुत्ररत्न प्राप्त झाले होते. अनिता ही टीव्ही मालिका तसेच चित्रपट या दोन्ही क्षेत्रांमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत होती.