ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने तो घरीच विलगिकरणात राहून औषधोपचार घेत आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.
अर्जुन कपूरला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नव्हती. मात्र, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच विलगिकरणात राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे.
दरम्यान, अर्जुनच्या एका शुटिंगचे काम सुरू होते. त्यावेळी तो अभिनेत्री नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंग यांच्या संपर्कात आला होता. अर्जुनच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबण्यात आले आहे.