बेंगळूर/प्रतिनिधी
ब्राम्हणवादावर नुकत्याच झालेल्या टीकेसाठी कन्नड अभिनेता चेतन कुमार याच्याविरोधात शहर पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. ब्राह्मण विकास मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती आणि विप्र युवा वेदिके या समुदाय संस्थेच्या तक्रारींवर आधारित हे दोन्ही खटले दाखल करण्यात आले आहेत. अनुक्रमे उल्सूर गेट व बसवणगुडी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. दोन्ही एफआयआरमध्ये पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ बी आणि २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता चेतन यांनी अलिकडे सोशल मीडिया पोस्ट करत ब्राह्मणवावर टीका केली होती.चेतनने समाज म्हणून आपल्याला लढा देण्याची गरज कशी आहे असे स्पष्ट करून समाज म्हणून ब्राम्हणांच्या विरोधात नव्हे तर ब्राम्हणवादाच्या विरोधात असल्याचे म्हंटले होते.
कन्नड अभिनेता उपेंद्रने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याने आणि अभिनेता चेतन याने प्रतिक्रिया दिल्याने हा वाद सुरू झाला.
व्हिडिओमध्ये, उपेंद्र यांनी लोकांना जातीबद्दल बोलू नये, असे आवाहन केले कारण ते यापुढेही कायम राहील. तर चेतन याने दुसर्या व्हिडिओसह प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी भारतीय समाजात जातीय विषमतेचे मूळ असल्याचे ब्राम्हणवादाचा निषेध केला. त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केले की ते एक समुदाय म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात नाहीत तर ‘ब्राह्मणवादाच्या’ विरोधात आहेत, जे आज ते सर्व समाज आणि अगदी इतर धर्मांमध्ये शिरले आहेत.