ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोविड-19 विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पटानी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, टायगर श्रॉफ आणि आणि दिशा पटानी त्यांच्या काही मित्रांसह काल दुपारी दोन वाजता वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात काही कारण नसताना कोरोना रोखण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध तोडून फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले आणि चौकशी केली. परंतु कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, सध्या राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. या काळात आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.