ऑनलाइन टीम / लंडन :
अभिनेता पूरब कोहली याला कोरोनाची लागण आहे. पूरब ने आपल्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली.
अधिक माहितीनुसार, सुदैवाने कोहली कुटुंबातील सर्वजण कोरोना मुक्त झाले आहेत. पूरब, त्याची पत्नी ल्यूसी, मुलगा ओशन आणि मुलगी इनाया अशा चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पूरब कोहली सध्या आपल्या कुटुंबाबरोबर लंडनमध्ये आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून आम्ही घरातच विलागीकरणत होतो, असे पूरबने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे सांगितले. पुढे तो म्हणाला, आता आम्हाला कोरोनाची लागण नाही. गेल्या गुरुवारी आमचा क्वारंनटाइन कालावधी संपला. देव न करो आणि ही लागण कोणालाही न होवो. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्या आणि कृपया घरी रहा असे आवाहन त्याने यावेळी जनतेला केले.
दरम्यान, पूरबचे रॉक ऑन, एअरलिफ्ट, माय ब्रदर निखिल, वो लम्हे आदी चित्रपट गाजले आहेत. याआधी पूरब व्हीजे म्हणून काम केले आहे.