- मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू
ऑनलाईन टीम / मुंबई :
आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र अचानकच सेटवर त्याची प्रकृती बिघडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल रॉयची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तात्काळ मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 52 वर्षीय राहुलला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सध्या त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. 1990 साली ‘आशिकी’ चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, राहुलने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटामध्ये उल्लेखनिय काम केल्यानंतर ‘सपने साजन के’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘जनम’, ‘प्यार का साया’, ‘जुनून’, ‘पहला नशा’, ‘गुमराह’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका बजावल्या आहेत.