ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता विकी कौशलने कोरोनावर यशस्वी रित्या मात केली आहे. शुक्रवारी विकी कौशलने सोशल मीडियावर आपली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली होती.
विकीने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर ऊन पडले आहे आणि तो हसत आहे. आपला हा हसऱ्या चेहऱ्याचा फोटो शेअर करत विकीने आपली टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
- 5 एप्रिल रोजी झाली होती कोरोनाची लागण
उरी फेम विकी कौशलला कोरोनाची लागण 5 एप्रिल रोजी झाली होती. त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली होती.
विकी कौशलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील केले होते.