- उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. त्याला झालेला फुफ्फुसाचा कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त लवकरच उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. अलिकडेच त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.
चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती दिली आहे. संजय दत्त लवकरच बरा होऊ दे, यासाठी आपण प्रार्थना करू असे ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संजय दत्तनेही मंगळवारी एक पोस्ट शेअर केली होती. माझ्या मित्रांनो, वैद्यकीय उपचारासाठी मी काही दिवसांपासून माझ्या कामावरुन ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि माझे मित्र माझ्याबरोबर आहेत. मी माझ्या हितचिंतकांना विनंती करतो की तुम्ही अजिबात काळजी करु नये आणि अनावश्यक निष्कर्ष काढू नका. आपल्या प्रेम आणि शुभेच्छा, मी लवकरच परत येईन, असे म्हटले होते.
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. आवश्यक उपचारानंतर संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.