प्रतिनिधी / मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली. २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मध्यंतरी त्यांनी परदेशात जाऊन उपचार करून घेतले होते. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. काही दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.